🔥 पुण्याच्या भावात पुस्तके थेट तुमच्या दारात! !!
🔥 पुण्याच्या भावात पुस्तके थेट तुमच्या दारात! !!
🔥पुण्याच्या भावात पुस्तके थेट तुमच्या दारात! !!

Refund Policy

अटी व शर्ती, ऑर्डर रद्द करणे, परतावा व रिफंड धोरण 

mpscbooksworld.com वर पुस्तकांची खरेदी करताना खालील अटी व शर्ती लागू राहतील. वेबसाइटवर ऑर्डर देताना ग्राहकाने या अटी व शर्ती वाचून त्यांना मान्यता दिलेली आहे, असे गृहीत धरले जाईल.

1. ऑर्डरची पुष्टी
ऑर्डर यशस्वीरीत्या नोंदवल्यानंतर ती निश्चित (Confirmed) मानली जाईल.

एकदा ऑर्डर निश्चित झाल्यानंतर ती कोणत्याही कारणास्तव रद्द करता येणार नाही.

2. रिफंड धोरण (Refund Policy)
खरेदीदाराने पुस्तकासाठी भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.

ऑर्डर निश्चित झाल्यानंतर ग्राहकाला ऑर्डर रद्द करून भरलेली रक्कम परत मागता येणार नाही.

3. पुस्तक परत करण्याचे धोरण (Return Policy)
एकदा खरेदी केलेले पुस्तक परत स्वीकारले जाणार नाही.

मात्र, पुस्तकामध्ये उत्पादनाशी संबंधित दोष असल्यास किंवा चुकीचे पुस्तक पाठवले असल्यास, खालील परिस्थितीत पुस्तकाची मोफत बदली (Exchange) करून दिली जाईल:

पुस्तकाच्या छपाईमध्ये गंभीर दोष असल्यास;
पुस्तकातील काही पाने कोरी असल्यास;
पुस्तकातील पाने गहाळ असल्यास;
ग्राहकाने ऑर्डर केलेल्या पुस्तकाऐवजी दुसरे/चुकीचे पुस्तक प्राप्त झाल्यास.
4. दोषपूर्ण किंवा चुकीचे पुस्तक बदलण्याची प्रक्रिया
दोषपूर्ण किंवा चुकीचे पुस्तक प्राप्त झाल्यास ग्राहकाने ते पुस्तक फक्त India Post च्या Registered Printed Book Post सेवेद्वारे पाठवावे.

पुस्तक परत पाठवण्यासाठी लागणारा पात्र टपाल खर्च mpscbooksworld.com कडून केला जाईल.

दोषपूर्ण किंवा चुकीचे पुस्तक mpscbooksworld.com कडे प्रत्यक्ष प्राप्त झाल्यानंतरच नवीन पुस्तक पाठवण्यात येईल.

पुस्तक परत पाठवताना ग्राहकाने टपालाची पावती सुरक्षित ठेवावी.

5. पुस्तकाची बदली (Exchange)
बदलीसाठी पाठवण्यात आलेले पुस्तक आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल.

वरील धोरणानुसार दोष किंवा चुकीची डिलिव्हरी आढळल्यास योग्य ते नवीन पुस्तक ग्राहकाला पाठवण्यात येईल.

ग्राहकाच्या पसंतीत बदल झाला, चुकीचे पुस्तक स्वतःच्या चुकीमुळे मागवले, किंवा पुस्तक आवडले नाही, अशा कारणांसाठी पुस्तकाची बदली किंवा रिफंड उपलब्ध राहणार नाही.

6. चुकीचा पत्ता किंवा संपर्क माहिती
ऑर्डर करताना ग्राहकाने दिलेला पत्ता, मोबाईल क्रमांक, ई-मेल किंवा इतर माहिती अचूक असणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे.

चुकीचा किंवा अपूर्ण पत्ता दिल्यामुळे पुस्तकाची डिलिव्हरी न झाल्यास त्याची जबाबदारी ग्राहकाची राहील.

7. संपर्क
या धोरणासंदर्भात काही प्रश्न, तक्रार किंवा पुस्तकाच्या बदलीसंदर्भात माहिती हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधा.

ई-मेल: mpscbooksworld@gmail.com

वेबसाइट: mpscbooksworld.com

MPSC Books World
आपल्या पुस्तक खरेदीसाठी धन्यवाद